उत्कंठा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणा अन्‌ शिक्षणही

उत्कंठा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणा अन्‌ शिक्षणही

शाळा म्हणजे अभ्यास तर आहेच; पण खेळ, धमालमस्ती आणि माहितीचा खजिनाही आहे... जीवनाला पैलू पाडणारी, नेतृत्व घडविणारी आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी पण शाळाच... त्यात भर पडलीये ‘सकाळ’च्या ‘ज्युनियर लीडर’ची... मुलांमधील कौशल्यांच्या वाढीसाठी सुरू केलेल्या या सदराला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या या ‘ज्युनियर लीडर’चे शाळांच्या मुख्याध्यापकांनीही मनापासून स्वागत केलंय.

विद्यार्थी मित्रांना आकर्षित करणारे ‘ज्युनियर लीडर’ सदर ही मेजवानी आहे. योगासनांची ओळख, स्लॅमबुकमधून भेटणारी रोल मॉडेल्स, व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू उलगडणारे लेखन, चेहऱ्यावर हास्य उमटवणारा हास्य कट्टा, ‘हेडेक’ न वाटणारी गणितकोडी, सुविचार, दिनविशेष हे सर्व पैलू विद्यार्थ्यांना आवडतात. त्याचबरोबर सेल्फीमधून त्यांची छबीही झळकते. स्पर्धेत उतरताना असे बहुआयामी विषय त्यांनी अभ्यासावेत, ही आमची इच्छा ‘सकाळ‘ने पूर्ण केली.
- अनघा गोखले, मुख्याध्यापिका, दामले प्रशाला, पुणे

विद्यार्थ्यांना कात्रणांच्या रूपाने माहिती संग्रहित करावयास उपयुक्त असे हे सदर. तितकेच ते चित्रांच्या व माहितीच्या माध्यमातून आकर्षित केलेले आहे. या सदरातील माहितीमुळे विद्यार्थी ‘सुविचार’ करायला लागतील, असा आत्मविश्‍वास वाटतो. माहिती, मजा, उत्कंठा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणा, शिक्षण या सर्वांचा उत्तम मेळ म्हणजे ‘ज्युनियर लीडर’. 
- गीतांजली बोधनकर, मुख्याध्यापिका, म. ए. सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल

अनेक वेब पेज उघडण्यापेक्षा ‘सकाळ’च्या या एकाच पानावर विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान, गणित, दिनविशेष, विनोद आणि जगभरातील मूळ भारतीय यशस्वी उद्योजकांची माहिती मिळत आहे. यामुळे विद्यार्थी, त्यांच्या भविष्याचा मार्ग ‘ज्युनियर लीडर’ सदराच्या माध्यमातून शोधू शकतील, असा मला विश्‍वास वाटतो.
- सुरेश गुजर, मुख्याध्यापक, सानेगुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, माळवाडी, हडपसर

वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी ‘ज्युनियर लीडर’ हे ‘सकाळ’मधील सदर अत्यंत उपयुक्त आहे. यामुळेच विद्यार्थी त्यांचे भावविश्‍व समृद्ध करू शकतील. तसेच त्यांचा शब्दसंग्रह वाढेल, विचार परिपक्व होतील. बाहेरच्या जगात होत असणाऱ्या घडामोडींची माहिती त्यांना होईल. स्तुत्य उपक्रम.
- नूतन बापट, मुख्याध्यापक, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूल

‘ज्युनियर लीडर’ हे सदर सुरू केल्याबद्दल ‘सकाळ’चे मनःपूर्वक अभिनंदन. हे सदर मुलांनी रोज वाचावे, विचारलेल्या प्रश्‍नांची सहज, सुंदर भाषेत उत्तरे देऊन समजून, नटवून स्पर्धेत क्रमांक पटकवा. सर्वांना शुभेच्छा.
- सुलभा शिंदे, अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल, शनिवार पेठ

‘ज्युनियर लीडर’ या उपक्रमामुळे मुलांच्या सामान्य ज्ञानात वाढ होऊन त्यांच्यात वाचनाची गोडी वाढणार आहे. तसेच या सदरातून विविध योगासनांची माहिती मिळाल्यामुळे शरीर कसे सुदृढ राहील, याची काळजीही विद्यार्थी घेतील. या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.
- कल्पना धालेवाडीकर, मुख्याध्यापक, माधव सदाशिव गोळवलकर विद्यालय, टिळक रस्ता.

काय आहे या सदरात
मनोरंजन, उद्योग, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या लीडर्सची ओळख, नेतृत्व विकासासंदर्भातील टिप्स, व्यायाम, योगासने, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठीचे फंडे व त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानातील अद्ययावत माहिती यातून साध्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर येत आहे. दर रविवारी खास पालकांसाठी, पालकत्वासंदर्भातील उपयुक्त सदरे.       
‘सकाळ’चे ‘ज्युनियर लीडर’ हे सदर विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी व त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पाडण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‘सकाळ’च्या सर्वच उपक्रमांमध्ये साधना विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग असतो. या उपक्रमास विद्यालयातर्फे शुभेच्छा.
- संजय मोहिते, प्राचार्य, साधना विद्यालय, हडपसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com