शिलकी मालाची जादादराने विक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम किरकोळ विक्रीवर होऊ लागला आहे. मालाची आवकच नसल्याने विक्रेते शिलकीतल्या मालाची तेही जादा दराने विक्री करू लागले आहेत. शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी वीस ते तीस टक्‍क्‍याच्या फरकाने विक्रेते मालाची विक्री करीत होते. त्यामुळे ग्राहक मात्र नाराज आहेत. 

कर्जमाफी आणि मालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका पुणेकरांना बसू लागला आहे. मालाची आवक घटल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला. 

किरकोळ विक्रेत्यांनाच शेतमाल महागात मिळत आहे. परिणामी, विक्रेत्यांना ग्राहकांची समजूत काढावी लागत आहे. महात्मा फुले मंडई येथे साधारणतः अडीचशे गाळेधारक आहेत. येथील गाळे शुक्रवारी सुरु होते. परंतु मंडईत गिऱ्हाईकांची म्हणावी तशी गर्दी नव्हती. नाशवंत असल्याने पालेभाज्यांना उठाव नव्हता. त्यातही कोथिंबीर, पुदिना, मेथीच्या गड्डीची विक्री पंचवीस ते तीस रुपयांनी होत होती. याबाबत गाळेधारक संजय गायकवाड म्हणाले,‘‘किरकोळ विक्रेत्यांना महागात माल मिळाला तर आम्हालाही तो तसाच विकावा लागतो. काल परवापर्यंत टोमॅटो आठ-दहा रुपये किमतीने खरेदी करीत होतो. आज त्याची खरेदी तीस रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे चाळीस रुपये किमतीने विकावे लागत आहेत.’’ 

विक्रेते राजेंद्र कासुर्डे म्हणाले,‘‘नेहमीपेक्षा मालाचा तुटवडा आहे. कोबी पन्नास ते साठ रुपये किलो, भेंडी ऐशी रुपये किलो, वांगी पन्नास ते साठ रुपये किलो, बटाटा बारा ते चौदा रुपये किलो, कांदा दहा ते बारा रुपये किलो दराने विक्री होत आहे. ग्राहक येत आहेत. परंतु मालाचा पुरवठा कमी आहे.’’ 
 
पंधरा ते वीस रुपये पाव किलोची भाजी आज तीस ते पंचेचाळीस रुपये किमतीने खरेदी करावी लागत आहे. संपामुळे सामान्य नागरिकच भरडला जातोय. त्यामुळे सरकारने याबाबत तोडगा काढावा.
- स्वाती पारसनीस, ग्राहक

Web Title: pune news Selling of heavy commodities