'लोकांशी जोडल्यामुळेच आदित्यनाथ मुख्यमंत्री '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - ""सर्वसामान्य लोकांशी सतत जोडलेला असणारा "योगी' या आपल्या महत्त्वपूर्ण ओळखीमुळेच योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदी बसू शकले. योगी असले तरी केवळ धार्मिक गोष्टीत ते कधीच रमलेले नाहीत. आपल्या मठात दैनंदिन भरविल्या जाणाऱ्या जनता दरबारातून ते अनेक वर्षे सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवत आले. दुर्दैवाने, अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मात्र केवळ "हिंदू योगी' ही ओळख डोळ्यांपुढे ठेवत त्यांच्याविषयी योग्य आधारावर वार्तांकन केले नाही,'' अशा शब्दांत लेखक शंतनू गुप्ता यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाठराखण केली. 

आदित्यनाथ यांच्या "द मोंक व्हू बिकेम अ चीफ मिनिस्टर' या चरित्र ग्रंथाचे लेखन गुप्ता यांनी केले आहे. त्याचेच औचित्य साधून पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये रविवारी गुप्ता यांची मुलाखत झाली. या वेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला. 

गुप्ता म्हणाले, ""आदित्यनाथ हे एक उत्तम प्रशासक असल्याचे मला अनेक महिने पुस्तकाच्या निमित्ताने गोरखपूर येथे केलेल्या वास्तव्यातून जाणवले. उत्तर प्रदेशात भाजपकडे अनेक बडी नावे असतानाही आपली जनमानसात असणारी लोकप्रियता आणि सक्षम नेता म्हणून असणारी ओळख, यामुळेच आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपद खेचून आणले. भाजपकडे दुसरा पर्यायच त्यांनी ठेवला नाही.'' 

अवघ्या 44 वर्षांचे असणारे आदित्यनाथ हे एक तरुण खासदार म्हणून केवळ पाच वेळा लोकसभेत गेले नाहीत, तर त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रश्‍न उपस्थित करत आपली सामाजिक-राजकीय समजही दाखवून दिली आहे, असेही गुप्तांनी नमूद केले.

Web Title: pune news Shantanu Gupta