वडिलांपेक्षा काकांचाच प्रभाव - पागे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘‘आमच्या कुटुंबात आध्यात्मिक वारसा पाच पिढ्यांचा. माझे काका वि. स. पागे मात्र राजकारणात होते; परंतु मला कधीच राजकारणात रुची नव्हती. मला वकीलच व्हायचे होते आणि मी वकीलच झालो; पण माझ्या आयुष्यात वडिलांपेक्षा काकांचाच प्रभाव अधिक राहिला. कारण, त्यांचे वक्तृत्व मला कायमच आकर्षित करीत राहिले’’, असे मत ॲड. शशिकांत पागे यांनी व्यक्त केले. 

अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी ॲड. पागे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यात्म, राजकारण, समाजकारण ते अगदी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष येथपर्यंतचा ॲड. पागे यांचा प्रवास मुलाखतीतून उलघडला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार उल्हास पवार, वा. ना. उत्पात, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्‍मिणी समितीचे सदस्य हभप. गहनीनाथ महाराज यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. ॲड. पागे आणि त्यांच्या पत्नी शिलावती पागे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

पंढरपूरला जुन्या भक्त निवास येथे संतपीठ व्हावे. अशी अपेक्षाही ॲड. पागे यांनी व्यक्त केली. पुरंदरे म्हणाले,‘‘ॲड. पागे हे देवभक्त आणि देशभक्तही आहेत. तो त्यांचा स्वभावतः स्थायीभाव आहे. त्यांनी मनापासून पंढरपूरच्या विठ्ठलाची आराधना केली. आस्थेने विविध प्रकारची सेवा तेथे रुजू केली. ते प्रसिद्धीच्या मागे कधीच लागले नाहीत. कर्तव्य आणि योग्यतेनेच ते मोठे झाले.’’

Web Title: pune news shashikant page talking