श्रावणी बैलपोळ्यानिमित्त बैलांना सजवून वाजत गाजत मिरवणूक

युनूस तांबोळी
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात पिंपरखेड, जांबूत, आमदाबाद येथे बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. गेल्या काही वर्षात या परिसरात दुष्काळी परिस्थिती होती. गेल्या काही दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिके जळून चालली होती. दोन दिवसापासून पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भागातली कुकडी नदी कोरडी पडली होती. या पावसामुळे ही नदी पाण्याने वाहू लागली आहे. धरणे शंभर टक्के भरल्याने पाण्याचे आवर्तन होणार यामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे पीक शेतात असल्याने सध्या आर्थिक चणचण जाणवत आहे. तरी देखील शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या बैलांना सजवून पुरणपोळी खाऊ घालतानाचे चित्र होते. या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल लेझीम वाजवीत बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. ग्रामस्थ एकत्रित येऊन हा सण साजरा करत असल्याने येथे कोणताच अनुचित प्रकार घडत नाही. बैलपोळा सणाला पिंपरखेड गावातून मोठ्या प्रमाणात उत्साह असायचा. न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी आणल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे. घरातील मुलांप्रमाणे बैलांना सांभाळत असल्याने त्यांना सजवून हा बैलपोळा साजरा केला जातो. बैलगाडा शर्यत सुरू करण्यास सरकारने मदत करावी. अशी मागणी पिंपरखेड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व शेतकरी निवृत्ती बोंबे यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: pune news shirur bail pola festival