आदिवासी महिलांना सर्वांगीण संस्थेतर्फे ब्लॅंकेटचे वाटप

pune news shirur kawthe yemai tribal women blanket social work
pune news shirur kawthe yemai tribal women blanket social work

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): दिसभर काम करायच...रोज पैक मिळवायच आणी पोरह संभाळायची. आम्हाला कसला आलाय खेळ, तुम्ही आलात की पोटभरून हसायला लावताया. मागपण तुम्ही आमच्या बरोबर खेळलात तव्हा पण आजाराच बोललात. पण खर सांगू आमच्यातला दोन महिलांना गळ्याचा आजार (थायरोईटचा) हाय. काम केल्याशिवाय पोरान्सी काय खाऊ घालायच. अन् या आजारावर खर्च करायला पैका कठून आणायचा. पण तुम्ही आला ना आम्हाला खूप आधार वाटतो बघा. अधिवासी ठाकर महिला बोलत होत्या. घाबरायच नाय लढायच... आम्ही तर त्यासाठीच येथे आलोय ना. असा धिर देत महिलाच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येत होते.

कवठे येमाई (ता. शिरूर) हिलाळवस्ती येथे अदिवासी ठाकर महिलांसाठी बॅलेक्ट व साडी वाटपाचा कार्यक्रम होता. त्यावेळी तेजस्वीनी सर्वांगीन विकास सेवा संस्थेच्या महिलांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी महिलांना गहिवरून आले होते. शिरूर येथील तेजस्वीनी सर्वांगीण विकास सेवा संस्थे मधिल महिला अधिवासी ठाकर महिलांसाठी काम करतात. नदीकाठी राहणाऱ्या या महिलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी या वर्षी बॅल्केट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी डॉ. ज्योती मुळे यांनी 40 कुटूंबासाठी बॅल्केट उपलब्ध करून दिले. या संस्थेच्या वतीने बॅल्केट व साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील या संस्थेच्या महिला या ठिकाणी आल्यावर अदिवासी महिलांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संगित खुर्ची व इतर खेळ घेण्यात आले. यावेळी संस्थेच्या अद्यक्षा वैशाली चव्हाण, कुमुदिनी बोऱ्हाडे, परवीन शेख, सुलताना शेख, कमल पवार, अनघा पाठकजी, विद्या गिरीगोसावी, सवीता लाटे, पुष्पा सुर्यवंशी, शुभांगी ढेंबरे, मेजर खुंड बोऱ्हाडे व ज्ञानदेव चव्हाण उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षीका योगीता चाटे यांनी केले होते.

आदिवासी वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. रस्त्याच्या मध्यावर ओढा असल्याने मुलांना शाळेत जाता येत नाही. रेशनिंग कार्ड नसल्याने सवलती मिळत नाही, अशा समस्या महिलांनी मांडल्या. त्यावेळी लवकरच संस्थेच्या माध्यमातून दोन महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

महिलांना बळकटीकरण...
या समाजातील मुलांना व पुरूषांना व्यसनापासून दूर करणार आहोत. या महिलांना पायावर उभे राहण्यासाठी बळकट करणार आहे. तरूणांच्या हातांना छोटे व्यवसाय देऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्था काम करणार आहे. या परीसरात फळांची झाडे लावून हा परीसर निर्सगरम्य करण्याचा प्रयत्न संस्था करत असल्याचे संस्थेतील महिलांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com