महावितरणच्या कार्यालयात मार्च एडिंगची जोरात तयारी

युनूस तांबोळी
शुक्रवार, 16 मार्च 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): आर्थीक वर्षा अखेरीच्या पार्श्वभुमीवर महावितरणने बिले वसूलीला चांगलाच दणका लावला आहे. महावितरणच्या कार्यालयात मार्च एडिंगची तयारी जोरात सुरू आहे. या वसूलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन वसुली करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असलेली पहावयास मिळत आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): आर्थीक वर्षा अखेरीच्या पार्श्वभुमीवर महावितरणने बिले वसूलीला चांगलाच दणका लावला आहे. महावितरणच्या कार्यालयात मार्च एडिंगची तयारी जोरात सुरू आहे. या वसूलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन वसुली करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असलेली पहावयास मिळत आहे.

महावितरणच्या माध्यमातून विद्युत देखभाल दुरूस्ती आणी वसुलीचे काम करण्यात येते. पुर्वी तीन महिन्याने बिले येत असल्याने वसुली देखील त्या हिशेबात होत असे. सध्या दरमहिन्याला विजेची बिले दिली जातात. पुर्वी दोन दोन महिने वीज बिल थकले तरी वसुली तितक्या ताकतीने केली जात नव्हती. वीज तोडणे हे तर फार लांबची गोष्ट होती. अलीकडे महावितरण व्यवस्थापनाने वसुलीवर इतके लक्ष केंद्रित केले की, मार्च महिना उजाडला की कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. या महिनाअखेर एक रूपयाही थकीत राहणार नाही याची व्यवस्था केलेली आहे. कार्यालयीन काम थोडे बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांना डोअर टू डोअर वसुलीचे लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे रजा, साप्ताहिक सुट्टी बंद करण्यात आली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्याच्या कामाची जबाबदारी निश्चीत केली आहे. थकबाकी दारांची यादी घेऊन कर्मचारी दारोदारी फिरू लागले आहेत. एखाद्या विभागात एक रूपयाही थकीत राहिला तरी त्याचा जाब संबधितांना विचारला जाणारा आहे. त्यामुळे सकाळापासून महावितरणच्या कार्यालायत गर्दी पहावयास मिळत आहे. औद्योगीक वसाहती मध्ये वेळेत बिज भरणा झाला नाही तर तातडीने विज खंडीत केली जाते. काहि वेळ जरी कंपनीची विज गेली तरी कंपनीचे नुकसान होऊन भवितव्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशी विजबिले वसूल होताना दिसतात. पुर्वी लोक वीज बिले भरण्यासाठी रांगा लावत होते. आता तुम्ही येऊ नका आम्हीच तुमच्या दारी येतो. पण बिल भरा अशी विनंती कर्मचारी करू लागले आहेत. अन्यथा वीज खंडीत करण्यास पुढाकार घेताना दिसू लागले आहेत. वीज बिले वसूल करून सायंकाळी कार्यालयात परतताना आज किती वसूली झाली याची माहिती साहेबांना द्यावे लागते.

वीजबिले भरण्यासाठी लगबग...
कोणतेही कारण न सांगता दिलेले लक्ष पुर्ण करा. वसूली झालीच पाहिजे असे वरिष्ठांचे आदेश असल्याने कर्मचारी कामाला लागलेले आहेत. वर्षभराचा ताळेबंद याच महिण्यात मांडला जातो. त्यामुळे महातविरणच्या कार्यालयात, बँका, पतसंस्था तसेच मोबाईल नेट बॅंकीगच्या माध्यमातून ही वीज बिले भरून घेतली जात आहे. केडगाव महावितरण क्षेत्रात शिरूर, टाकळी हाजी, रांजणगाव, पाबळ, शिक्रापूर या परीसरात असणाऱ्या वीज ग्राहकांनी बीले न भरल्यास वीज खंडीत केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्राहक व महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे. महावितरण शुन्य टक्के थकबाकी मुक्त करण्यासाठी प्रत्येक महिना हा मार्च एंडीग सारखा असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी विज बिले त्या त्या महिन्यात भरून महावितरणला सहकार्य करावे.

Web Title: pune news shirur mahavitaran light bill march ending