मलठणमध्ये 'पक्षी वाचवा, चिमणी वाचवा` कार्यक्रम

युनूस तांबोळी
बुधवार, 21 मार्च 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार करून `पक्षी वाचवा, चिमणी वाचवा` अभियानांतर्गत पक्ष्यांची घरटी, पाणीपात्र, धान्य वाटपाचा कार्यक्रम येथील मलठण (ता. शिरूर) येथील जिल्हा परीषद केंद्र शाळेत घेण्यात आला.

जागतीक चिमणी दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चिमणी व घरट्याविषयी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक सुभाष जाधव, रमेश थोरात, शिवाजी घोडे, हेमलता बागले, पुष्पा वाळुंज, छाया जाधव, पदमाकर काळे, रेखा पिसाळ, मनिषा दरेकर, आबा पवार आदि विद्यार्थी उपस्थीत होते.

चिमणीवरच्या कविता, पंचतंत्रातील चिमणीच्या गोष्टी, टाकाऊ वस्तूंपासून चिमणीसाठी घरटी बनविण्याचे प्रशिक्षण, छायाचित्रावरून विविध पक्षी ओळखण्याचा खेळ, अशा उपक्रमांनी या अभियानाला सुरवात झाली.

चिमण्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, तसेच अंगावरील परजीवीपासून मुक्तता मिळविण्य़ासाठी पाण्याची आणि धुळीचीही आंघोळ गरजेची असते. आता चिमण्यांना प्यायला आणि अंघोळीलाही पाणी मिळत नाही. शिवाय डांबरी रस्ते आणि कांक्रिटीकरणात चिमण्यांसाठी मातीही राहिली नाही. ठराविक दिवसांचे झाल्यावर एका दिवसात उडायला शिकणारे चिमणीचे पिलू चार दिवस जमिनीवरच रेंगाळते. मांजर, कावळे, शिकारी पक्षी यांच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता वाढते. पर्यावरणपूरक विकास, झुडपे व देशी झाडे लावणे हे यावरील उपाय असू शकतील. असे शिवाजीराव घोडे यांनी सांगितले.

Web Title: pune news shirur malthan student sparrow