शिरूर तालुक्य़ातील गावे मुख्य रस्त्याला जोडणार: पाचर्णे

नागनाथ शिंगाडे
सोमवार, 19 मार्च 2018

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरूर-हवेली तालुक्यातील प्रत्येक गाव मुख्य रस्त्याला जोडण्यास प्राधान्य दिले जात असून, दळणवळणामुळे आर्थिक विकास होवून रोजगार निर्मितीत भर पडत आहे. शासनामार्फत रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत सुवीधांकडे विशेष लक्ष दिले जात असून, पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त निधी शिरूर-हवेली मतदार संघात
सत्तेच्या जोरावर मुख्यमंत्री व विविध खात्यांच्या मंत्र्यांकडून आपण खेचून आणला आहे.

आगामी काळात विकासाच्या कामासाठी ग्रामस्थांनी संघटीत सहकार्य करावे असे आवाहन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले. श्री क्षेत्र टाकळी भीमा (ता.शिरूर)येथील विविध वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार पाचर्णे बोलत होते. यावेळी टाकळी भीमा ते तळेगाव ढमढेरे रस्ता, बाळोबाचीवाडी ते न्हावरा रस्ता डांबरीकरण आणि होमाचीवाडी येथे सिमेंट कॅाक्रीट या रस्त्यांचे भूमिपूजन तसेच घोलपवाडी येथील अंगणवाडीचे उदघाटन श्री पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार पाचर्णे म्हणाले की, शिक्रापूर-न्हावरा-चौफुला या राष्ट्रीय महामार्गातील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे ते न्हावरा हा चालू स्थितीतील रस्ता अत्यंत खराब झाला असून तो रस्ता तातडीने दुरूस्ती  करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून त्यांनी हिरवा कंदील दाखवून या रस्त्याच्या डागडुजीसाठी सुमारे 14 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. तसेच कासारी फाटा ते निमगाव म्हाळुंगी रस्ता आणि रांजणगाव गणपती ते निमगाव म्हाळुंगी पालखी मार्गाच्या रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. जेजुरी-बेल्हा या रस्त्याचे कामही मार्गी लागले असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे-नगर रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्यायी मार्गांचा प्रस्ताव असून त्यालाही लवकरच यश मिळणार आहे. मी सत्तेत असल्याने निधी भरपूर आणला असून विकासाचा बॅकलॉग लवकरच भरून निघणार असल्याचे श्री पाचर्णे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल वडघुले, अर्चना भोसुरे, बाजार समितीचे माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर, संचालक विकास शिवले, सरपंच रविंद्र दोरगे, बाळासाहेब चव्हाण, उद्योजक राजेश लांडे, युवा नेते संदीप ढमढेरे, राजाभाऊ मांढरे, अलका राऊत, किरण काळे, कैलास सोनवणे, संभाजी ढमढेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, संतोष मोरे, दिलीप शेलार, दत्तात्रेय हरगुडे, ग्रांमपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: pune news shirur mla baburao pacharne road bhumi pujan