हमीभावाबाबत सरकारकडून दिशाभूल: वळसे पाटील

युनूस तांबोळी
मंगळवार, 20 मार्च 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर): राज्यात शहरातील मतांचा विचार करून बुलेट ट्रेन व स्मार्ट सिटीसारख्या योजना राबविल्या जात आहेत. शेतमालाच्या बाजारभावामुळे ग्रामीण भागातील खरा पोशिंदा असणारा शेतकरी भरडला जात आहे. नोटाबंदी, जीएसटी आणून मोदी सरकारने सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. "अच्छे दिन'च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला भुलवून सत्ता काबीज केली. 2022 मध्ये हमीभाव देणार, असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील शिरूरमधील 39 गावांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ""केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखरेच्या भावाची घसरण होत आहे. राज्यातील सहकारी व खासगी कारखाने एका क्विंटलमागे सहाशे ते सातशे रुपये तोटा सहन करून सुरू आहेत. भविष्यात कारखान्यांना उसाची एफआरपी देता येईल की नाही याची खात्री नाही. यावर्षी 25 टक्के उसाचे उत्पादन वाढले. राज्यातील साखर कारखाने बंद पडावेत असे धोरण या सरकारचे आहे. बाजारपेठेत टोमॅटोला दीड रुपये भाव तर भाजीपाल्यात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. विदर्भात कापूस, सोयाबीनच्या पिकामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर या सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे.''

"राष्ट्रवादी, कॉंग्रेस सरकार हे अढळ सत्य'
राज्यात शिवसेना सत्तेत असून काही बोलत नाही, की कुठेही विकासाची कामे दिसून येत नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखविले. 15 लाख रुपये खात्यात जमा करतो. स्वामिनाथन आयोग लागू करू, असे सांगून शेतकऱ्यांना फसविण्याचे धोरण राबविले. आपणदेखील त्यांच्या या भुलभुलय्याला फसलो. यापुढे हे होणार नाही. भविष्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता हे अढळ सत्य आहे. यासाठी शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या पश्‍चिम महाराष्ट्राच्या परिसरात होणाऱ्या हल्लाबोलच्या मोर्चात सामील व्हा, असे आव्हान दिलीप वळसे पाटील यांनी केले.

Web Title: pune news shirur ncp dilip walse patil and government