पुणेः पावसाने रांजणखळगे भरू लागले (व्हिडिओ)

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे सुरू असणाऱ्या पावसामुळे कुंडपर्यटनस्थळ जगप्रसिद्ध रांजणखळगे पाण्याने भरून वाहू लागले आहेत.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे सुरू असणाऱ्या पावसामुळे कुंडपर्यटनस्थळ जगप्रसिद्ध रांजणखळगे पाण्याने भरून वाहू लागले आहेत.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते तीन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सततच्या पावसामुळे पुणे व शिरूरच्या सरहद्दीवर असणारे कुकडी नदीतील सुप्रसिद्ध रांजणखळगे पाण्याने भरून वाहत आहे. परीसरातील पाऊस व धबधब्यांमुळे येथील नैसर्गीक वातावरणात बदल झाला असून, पर्यटकांना ही पर्वणी झाली आहे.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात नवरात्र उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. गुरूवारी (ता. 21) घटस्थापनेने नवरात्र उत्सावाला सुरूवात होणार आहे. मात्र, या परीसरात आज (बुधवार) पासून पावसाच्या आगमनाने सगळीकडे चित्र बदलून गेले आहे. पावसाची संततधार सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनत चालला आहे. कुंडपर्यटन स्थळ (रांजणखळगे) येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील कुकडी नदी वाहताना दिसत आहे. येथील रांजणखळगी पाण्याने भरून वाहत आहे. रांजणखळग्यामधून वाहणारे फेसाळणारे पाणी व धबधबे आकर्षक दिसू लागले आहेत. येथील झुलत्या पूलावरून हा परीसर आकर्षक दिसू लागला आहे. या परीसरातील सुरू असणारा पाऊस यामुळे या नदीला पूर येण्याची शक्यता आहे. या झुलत्या पूलावरून कोणीही प्रवास करू नये. या परीसरात पाऊसाने खडकही शेवाळलेले आहे. त्यामुळे हा परीसर पर्यटकांनी सध्या तरी दुरूनच पहावे अन्यथा येथे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या आठवड्यात जोरदार झालेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. तलाव, बंधारे व विहीरी तुडूंब भरल्या होत्या. त्यातून सुरू असणाऱ्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी बंधारे व तलाव पाण्याने वाहू लागले आहेत. काही शेतकऱ्यांचे बाजरीचे पिक आजही शेतात पाण्यात खेळताना दिसत आहे. पावसामुळे धान्याचे नुकसान होऊ लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com