विद्यार्थी, पालकांनी हाती घेतले जलसंधारणाचे काम

युनूस तांबोळी
गुरुवार, 22 जून 2017

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): पाणी आडवा पाण जिरवा... पाणी असेल तर जगेल असेन... पाण्याचे व्यवस्थापन योग्य करा...  जय जवान जय किसान... अशा घोषणा देत टाकळी हाजी येथील विद्यार्थी, पालक व पदाधिकाऱ्यांनी जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे. उचाळेवस्ती येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी मातीचा बंधारा तयार केला आहे.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): पाणी आडवा पाण जिरवा... पाणी असेल तर जगेल असेन... पाण्याचे व्यवस्थापन योग्य करा...  जय जवान जय किसान... अशा घोषणा देत टाकळी हाजी येथील विद्यार्थी, पालक व पदाधिकाऱ्यांनी जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे. उचाळेवस्ती येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी मातीचा बंधारा तयार केला आहे.

राज्यात सकाळ माध्यम समुह व शासनपातळीवर गावागावात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. यातून पावसाचे पाणी आडवून जमीनीत जिरविण्यात येणार आहे. त्याचा फायदा जमीनीची पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होणार आहे. यातून प्रेरणा घेत टाकळी हाजी तनिष्का गटाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेण्यात आल्याची माहीती मळगंगा तनिषका गटाच्या अध्यक्षा व जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांनी दिली. यासाठी त्या त्या परीसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचा सहभाग घेतला जात आहे. पावसाच्या अगोदर या परीसरात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामातून मातीचे बंधारे, ओढा खोलीकरण, वाळूच्या गोण्यांचे बंधारे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी संबधीत गावातील ग्रामस्थ पूढाकार घेऊ लागल्याचे पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे यांनी सांगितले.

उचाळेवस्ती येथे मातीचा बंधारा तयार करण्यात आला. या साठी ग्रामस्थांनी लोकसहभाग दाखवीत टिकाव, खोरे व फावडे आणले होते. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा उचाळेवस्ती येथील विद्यार्थी व शिक्षक या कामात सहभागी झाले होते. आता पेटवू सारे सारे रान.... या गिताने या कामाची सुरवात करण्यात आली. यातून ग्रामस्थांमधून कामासाठी चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी जिल्हा परीषद सदस्य सुनीता गावडे, पंचायत समिती सदस्य अरूणा घोडे, सुनंदा उचाळे, चंद्रकांत साबळे, डॅा. प्रकाश उचाळे, रंजना खोमणे, कुंडलीक उचाळे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

Web Title: pune news shirur talkali haji people working for water