तामखरवाडी येथील यात्रा उत्साहात

युनूस तांबोळी
शनिवार, 20 जानेवारी 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): संथ वाहनारी घोडनदी, डोंगराच्या टोकाला असणारे मंदिर, डोंगरात दडलेली तामखरबाबाची मुर्ती, सनईच्या सुरात संबळ ताशाच्या तालावर सवाद्य निघालेली काठी, त्यातच तामखरबाबा की जय च्या जयघोषात अभीषेक, हारतुरे, व शेरणी वाटपाने शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तामखरबाबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेनंतर या भागातील यात्रांचा हंगाम सुरू होतो.

टाकळी हाजी (ता. शिरूर) तामखरवाडी येथे तामखरबाबाच्या यात्रेनिमित्त सकाळी अभीषेक, शेरणी, काठीच्या मिरवणुकीसाठी भावीकांनी गर्दी केली होती. येथे जुन्या काळचे डोंगरात कोरलेल्या ठिकाणी तामखरबाबाचे मुर्तीचे अस्तित्व पहावयास मिळते. या देवाला पुर्वी भुतनाथ असेही म्हटले जात होते. समाज जागृती होऊन येथे बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली. तेव्हापासून या ठिकाणी गोड नैवेद्य देण्याचे काम होत आहे. घोडनदच्या किनारी असणाऱ्या डोंगरात हे मंदिर आढळते. प्रत्येक पोर्णीमेला येथे देवाची आराधना केली जाते. तामखर बाबाच्या यात्रेनंतर या भागातील यात्रांच्या हंगामाला सुरूवात होते. या वर्षी देखील काठीच्या मिरवणुकीला भावीकांनी मोठ्या प्रमाणात गर्द केली होती. भावीकांच्या मनोरंजनासाठी संभाजी जाधव सह शांताबाई जाधव संक्रापुरकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम दुपारी करण्यात आला. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे व सरपंच दामुशेठ घोडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मनोरंजनासाठी बैलगाडा शर्यतीची जागा तमाशा फडाने घेतल्याने या यात्रेला वेगळे स्वरूप आले होते.    

मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री सवाद्य काठीची मिरवणूक काढत छबीन्याचा कार्यक्रम झाला. यावेळी शोभेचे दारूकाम करण्यात आले होते. रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. 

Web Title: pune news shirur tamkharbaba yatra