वडनेर खुर्द येथील गुरुनाथ यात्रा उत्साहात

युनूस तांबोळी
शुक्रवार, 23 मार्च 2018

टाकळी हाजी, (ता. शिरूर, पुणे): सनईच्या सुरावर ढोल-ताशाच्या गजरात पारंपरिक ढोल लेझीमचा खेळ, गूळ-खोबऱ्याच्या शेरणीबरोबर भंडाऱ्याची उधळण, विद्युत रोषणाई केलेल्या मंदिरात "गुरुनाथ महाराज की जय'च्या जयघोषाने वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील गुरुनाथ महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली.

यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सात दिवस काकडा, भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रेच्या सुरवातीला बुधवारी (ता. 21) सकाळी अभिषेक करण्यात आला. सायंकाळी गावातून सवाद्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या पालखी सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली होती. गुरुवारी (ता. 22) सकाळी सवाद्य काठीची मिरवणूक निघाली होती. भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी काठी नाचवली. या वेळी शेरणी व नैवेद्याचा कार्यक्रम झाला. घरोघरी गोड जेवण करण्यात आले होते. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराभोवती ग्रामस्थांनी लावलेली वडाची झाडे मोठी झाल्याने भाविकांना ऐन उन्हाळ्यात सावलीचा गारवा मिळत होता. दुपारी प्रल्हादजी महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. गोपाळबुवा मकाशिर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मनोरंजनासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: pune news shirur vadner khurd yatra