वाघाळे शाळेला कंपनीकडून शौचालय युनिटचे हस्तांतरण

युनूस तांबोळी
शनिवार, 17 मार्च 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शिरूर तालुक्यात फियाट कंपनीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना शौचालय युनीट देऊन शाळा हगणदारी मुक्त करण्याचे काम करण्यात आले आहे. उत्तम तयार केलेल्या या युनीटच्या स्वच्छता व संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थ व शिक्षकांनी घ्यावी. असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य विश्वास कोहकडे यांनी केले.

वाघाळे (ता. शिरूर) जिल्हा परीषद शाळेला फियाट कंपनीच्या माध्यमातून शौचालय युनीटचे हस्तांतरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच बबनराव शेळके, कंपनीचे वरीष्ठ अधिकारी अनिरूद्ध बूरगूल, अमोल फटाले, दत्तात्रेय पाचुंदकर, दिलीप थोरात, वाल्मीक गावडे, राजेंद्र भोसले, सुहास काटे, राजेंद्र धायबर, आनंदराव सोनवने, उषा थोरात, राजेंद्र थोरात, आबा थोरात, भरत बांदल आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

कोहकडे म्हणाले की, शाळांमध्ये शौचालय युनीट तयार झाल्याने मुलांना स्वछतेची सवय लागणार आहे. औद्योगीक वसाहतीतील इतर कंपन्यांनी देखील असे शिक्षणासाठी नवनवीन उपक्रम राबवावे. त्यातून सामाजीक हिताचे काम होण्यास मदत होईल. स्वच्छ भारत सुंदर भारत या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप थोरात यांनी केले. 

Web Title: pune news shirur waghale school toilet fiat company