दुग्धाभिषेक, ‘ॐ नमः शिवाय’चा जागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ अनुभवायला मिळणारा श्रावण सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार आला. महादेवाला बेल, शहाळ्याचे पाणी, पिंडीवर दुधाची धार धरण्यासाठी भाविकांची पावले मंदिरांकडे वळली. ‘ओम नमः शिवाय’च्या नामस्मरणात दर्शन घेत होते. 

शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर मंदिर, अमृतेश्‍वर मंदिर, कर्वे रस्त्यालगतचे पांचाळेश्‍वर मंदिर आणि मृत्युंजयेश्‍वर मंदिर, काँग्रेस भवन समोरील वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर मंदिर, सदाशिव पेठेतील विश्‍वेश्‍वर मंदिर, रविवार पेठेतील सोमेश्‍वर मंदिर आदी ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. 

यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत. त्यामुळे  शिवमूठ म्हणून महिलांना अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू वाहता येणार आहेत. 

मठ-मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, होमहवन यासारखे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम महिनाभर महादेवाच्या मंदिरांत आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. 

सोमवारी (ता.२४) भाविकांनी मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाचा लाभ घेतला. ओम नमः शिवायची ध्वनीफीतही विविध ठिकाणी लावण्यात आली होती. 

देवदर्शनासाठी आलेल्या ऋतू जाना म्हणाल्या,‘‘मी प्रथमच शिवमूठ वाहण्यासाठी आले आहे. शिवमूठ वाहताना मन प्रसन्न झाले. अनेक महिला आजही हे व्रत जोपासतात.’’

श्रावणी सोमवारपासून सोळा सोमवारचे व्रत करण्याची प्रथा आहे. ज्यांची इच्छा असते, ते हे व्रत या दिवसापासून सुरू करतात. पहिला सोमवार असल्याने शिवलिंगास दहीभात, चक्क्याची पूजा करण्यात आली. श्रावणात मंदिरात मृत्युंजय मंत्रपठण आणि मृत्युंजय यागही असतो.
- श्रीकृष्ण कुलकर्णी, पुजारी, मृत्युंजयेश्‍वर मंदिर, कोथरूड

Web Title: pune news shiv mandir

टॅग्स