आम्ही आक्रमकता सोडणार नाही: खासदार सावंत

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 18 मार्च 2018

शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनी हे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आज पुण्यातील शिवसैनिकांचे बौद्धिक घेतले.

पुणे : "बौध्दिकतेचा वर्ग घेत असली तरी शिवसेना आपली आक्रमकतेची भूमिका कधी ही सोडणार नाही." असे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनी हे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आज पुण्यातील शिवसैनिकांचे बौद्धिक घेतले. या प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन खासदार सावंत यांच्या हस्ते शनिवारी कोंढवे धावडे येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख सत्यवान उभे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, प्रबोधिनीचे पुण्याचे अधीक्षक राहुल टोकेकर व वक्त्या डॉ.अरुणा कौलगुड, कार्यक्रम समनवयक वैभव गोडसे उपस्थित होते. 

मोदी यांना नर्मदा आंदोलनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांना पाठवून पाठिंबा दिला. गुजरात दंगलीनंतर मोदींना हटविले जाणार होते. शिवसेनाप्रमुखांनी जाहीर पाठींबा देत त्यांना हटविण्यास विरोध केला. त्यामुळे, मोदी मुख्यमंत्री राहिले आणि पुढे पंतप्रधान झाले. असे सांगून सावंत म्हणाले, "परन्तु शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे व शिवसेनेला खिंडीत पकडण्याची एक ही संधी मोदी व भाजपने सोडली नाही. लोकसभेत 282चा आकडा गाठल्या नंतर भाजपच्या भूमिकेत फार मोठा बदल झाला. राज्यात युती तुटली हे सांगणारे एकनाथ खडसे आज कुठे आहेत. पक्षाचे नाव स्वाभिमान असलेलले लोक सत्ता मिळताच लाचार झाले आहेत. असे खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली आहे. तर राज्यातील निकालानंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर होणारी कारवाई टाळली."
मोकाटे म्हणाले, "शिवसैनिक आक्रमक असून त्याला आंदोलने करायची आहेत. पण त्याला बौध्दिकतेची जोड देऊन आम्हाला अपेक्षित यश मिळवायचे आहे."
प्रबोधिनीच्या वक्त्या डॉ.अरुणा कौलगुड यांनी संघटन कौशल्य, दीपक जाधव यांनी बूथ व निवडणूक व्यवस्थापन तर अजित जोशी यांनी भाषण कला यावर सविस्तर मार्गदर्शन केले."

खासदार सावंत -

 • शिवसेना विजयी कशी होणार यावर काम करा.
 • पक्षाने काय भूमिका घ्यावी हे सांगत बसू नये.
 • गटप्रमुखानी किल्लेदार व्हावे.
 • मोर्च्या आंदोलनात फोटोत येण्यासाठी धडपडू नये
 • होर्डिंग्ज लावण्यापेक्षा एकत्र येऊन काम करा
 • उपक्रम घेताना समाज उपयोगी उपक्रम घ्यावेत
 • त्याचे ज्ञान उपजत असावे
 • पद मिळाले की त्याच्या बरोबर इगो ही येतो
 • बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा. 
 • जाती व्यवस्था मजबूत होत आहे
 • शिवसेना जात व्यवस्था न मानणारा
 • युतीत प्रेम होते व्यवहार नव्हता
Web Title: pune news Shiv Sena MP Arvind Sawant statement