विजेच्या समस्या लवकर सोडविल्या जातीलः आढळराव पाटील

युनूस तांबोळी
शनिवार, 15 जुलै 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): मलठण (ता. शिरूर) परिसरातील विजेच्या समस्या लवकर सोडविल्या जातील. या भागातील अंगणवाडीसाठी नव्याने इमारतीचे प्रस्ताव करावेत. ते मंजूर करून आणतो. आरोग्याची समस्या जाणवत असल्याने मलठणचा परिसर कवठे आरोग्य उपकेंद्राला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

मलठण येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर "खासदार आपल्या दारी' उपक्रमांतर्गत आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार रणजित देशमुख, कृषी अधिकारी संजय पिंगट, गटविकास अधिकारी संदीप जठार, महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे, शिरूरचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड, शिक्रापूरचे नितीन महाजन, साहाय्यक अभियंता संतोष पंचरस, पाणीपुरवठा विभागाचे आर. बी. येंधे, एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी एस. के. बेंगाळ, अरुण गिरे, जयश्री पलांडे, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच अनिता लकडे, माजी सरपंच माधुरी थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाच्या दिशा ठरवीत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. यासाठी जनता दरबार भरविला असून जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. नागरिकांनी योग्य समस्या मांडून अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आढळराव पाटील यांनी केले.

विजेच्या तारा नाहीत, वीजबिल जास्त येते, अनेक वर्षे शेतीपंपासाठी वीजजोड नाही, अशा अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. कृषी विभाग, महसूल, आरोग्य, बांधकाम व पाणीपुरवठा या विषयावर नागरिकांनी समस्या मांडल्या. या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नवीन रस्ते तयार करण्यासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, अशी निवेदने देण्यात आली. सूत्रसंचालन विलास थोरात यांनी केले. आभार उपसरपंच सखाराम मावळे यांनी मानले.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pune news shivaji adhalrao patil shirur electricity