महालक्ष्मी लॉन्सला जुगलबंदी रंगणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

पुणे - पुण्याच्या ‘सा’ व ‘नी’ संस्थेने १५ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाला पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतुरवादन व त्यांना तबल्यावर संगत उस्ताद झाकिर हुसेन अशी मैफल आयोजित केली आहे, अशी माहिती संयोजक सुरेंद्र मोहिते यांनी दिली. हा कार्यक्रम राजाराम पुलापलीकडील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. 

यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग भारत विकास परिषदेने चालवलेल्या उपक्रमाला दिला जाणार आहे. येथे गरीब अपंगांसाठी ‘जयपूर फूट’ बनवला जातो आणि जर्मन तंत्रज्ञान वापरून मधुमेह झालेल्या अपंग व्यक्तींसाठी ‘डायबेटिक फूट’ बनवून विनामोबदला तो दिला जातो.  पाच वर्षांनंतर होणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमाची थोडीच तिकिटे बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक व मराठे ज्वेलर्स यांच्याकडे उपलब्ध आहेत. 

ऑनलाइन बुकिंग bookmyshow  
दुरध्वनीवर बुकिंग : ९२७०४२९०००.
कार्यक्रमाच्या दिवशी १५ जुलै रोजी तिकिट विक्री महालक्ष्मी लॉन्स येथे दिवसभर सुरू राहील

Web Title: pune news shivkumar sharma & jhakir husain event