मुख्यमंत्री व महापौरांच्या फलकावर कचरा टाकून शिवसेनेचा अभिषेक

हडपसरः रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या नियोजीत नवीन कचरा डेपो विरोधात शिससेनेच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हडपसरः रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या नियोजीत नवीन कचरा डेपो विरोधात शिससेनेच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पुणे (हडपसर): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या नियोजीत नवीन कचरा डेपो विरोधात शिससेनेच्यावतीने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापौर यांच्या फलकावर कचरा टाकून कचरा अभिषेक घालण्यात आला व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रद्द करा, रद्द करा कचरा डेपो रदद् करा, महापौरांच करायच काय खाली डोके व वर पाय अशा धोषणा देत महापालिकेच्या या निर्णयाचा शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. सोलापूर रस्तायवरील वर्दळीच्या रामटेकडी चौकात हे आंदोलन झाल्याने चौकाच्या दुर्तफा वाहनांच्या लाब रांगा लागून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अमोल हरपळे, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, विक्रम लोणकर, दिलीप कवडे, राम खोमणे, भरत चौधरी, नगरसेविका संगिता ठोसर, गंगाधर बधे, सतीश कसबे, जानमहमद शेख यांसह मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

बाबर म्हणाले, महापालिकेला हडपसरला कचरा नगरी करावयाची आहे. त्यामुळे जीव गेला तरी चालेल, प्रसंगी रस्त्यावर झोपेने. मुख्यमंत्री अथवा कच-याची एकही गाडी याठिकाणाहून जावू देणार नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने कचरा डेपो विरोधात हवे ते करायची प्रत्येक शिवसैनिकाची तयारी आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com