‘द काउंटिंग’ शॉर्ट फिल्म अव्वल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे - ‘रि बर्थ फाउंडेशन’तर्फे आयोजित केलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ या अभिनव शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये ‘द काउंटिंग’ अव्वल ठरली. ‘आय सी यू’ दुसरा तर, ‘टू कप्स’ या शॉर्ट फिल्मला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

अवयव दानावर आधारित शॉर्ट फिल्मची स्पर्धा हा अनोखा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. जम्मू-काश्‍मीर, जयपूर, गोवा, तमिळनाडू, महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापूर, अकलूज, मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. ऑनलाइन पद्धतीने शॉर्ट फिल्मचे परीक्षण करण्यात आले. सांस्कृतिक विभागाचे सचिव आणि फिल्मसिटीचे संचालक मिलिंद लेले, पुण्याच्या झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीच्या समन्वयक आरती गोखले, लाइफ स्कूल फाउंडेशनचे प्रशिक्षक नरेंद्र गोयदाने, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी परीक्षण केले. त्यातून या सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे या शॉर्ट फिल्म्स नुकत्याच दाखविण्यात आल्या. त्या वेळी टिळक यांच्या हस्ते विजेत्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार देण्यात आला. पासपोर्ट ऑफिसर अतुल गोतसुर्वे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद राजहंस, मिलिंद मराठे, नीलेश जकोटिया आणि री बर्थ फाउंडेशनचे राजेश शेट्टी व्यासपीठावर उपस्थित

Web Title: pune news short film festival