आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणले पाहिजे - नाईक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - ""आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. या देणगीची ताकद सारे जग अनुभवत आहे. सक्षम आरोग्यसेवा देण्यासाठी आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे,'' असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. 

वैद्य एम. व्ही. कोल्हटकर आयुर्वेद प्रतिष्ठानच्या वतीने "क्‍लिनिकल आस्पेक्‍ट ऑफ त्रिस्कंध आयुर्वेद' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यात कोल्हटकर यांच्यावर आधारित "माधवाय स्वाहा:' या पुस्तकाचे व त्यांच्यावरील ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप गाडगीळ, संस्थेचे सचिव वेधस कोल्हटकर, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, शशिकांत क्षीरसागर, दिवाकर जुवेकर उपस्थित होते. 

नाईक म्हणाले, ""एम. व्ही. कोल्हटकर यांनी दिलेल्या प्रात्यक्षिक ज्ञानाच्या जोरावर त्यांचे विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करताना दिसत आहेत.'' 

वेधस कोल्हटकर म्हणाले, ""संस्थेने आयुर्वेदिक शिक्षण, विद्यार्थी शिष्यवृत्ती, आयुर्वेद संशोधन यावर कार्य करण्यासाठी गुरुकुलाची स्थापना केली आहे. येथील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.'' 

ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सकांनी मार्गदर्शन केले. वैद्य अनघा डफळापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद कुलकर्णी, आल्हाद परांजपे, संजय पेंडसे, त्रिलोक धोपेश्वरकर, विवेक साने, धनंजय कुलकर्णी, स्मिता साठे आदींनी संयोजन केले.

Web Title: pune news Shripad Naik