लेखणीशी इमानदार राहणे हा पत्रकारांचा गुन्हा का? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - ""सांस्कृतिक सत्याशी, लेखणीशी इमानदार राहणे हा पत्रकारांचा गुन्हा आहे का? यामुळे पत्रकारांवर हल्ले होत असतील, त्यांचे खून होणार असतील तर लोकशाही किती सुरक्षित आहे?'' असा प्रश्‍न साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी उपस्थित केला. आपलेच लोक आपल्या विरोधात असल्यामुळे भारताचे सार्वभौमत्व संपविण्यासाठी यापुढे पाकिस्तान, चीनसारख्या देशांची गरजच भासणार नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

कर्मयोद्धा प्रतिष्ठानच्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचा निषेध करून त्यांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. महापौर मुक्ता टिळक, "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले, संमेलनाध्यक्ष गजेंद्र बडे, स्वागताध्यक्ष निखिल भातंब्रेकर उपस्थित होते. 

सबनीस म्हणाले, ""लोकशाही जगवण्याचे काम न्यायालयांबरोबरच पत्रकारिता करत आहे.'' 

अरणकल्ले म्हणाले, ""पत्रकारांनी केलेले अभ्यासपूर्ण लेखन हे साहित्याचे महत्त्वाचे अंग आहे. अशा लेखनाचा साहित्याचे दालन समृद्ध होण्यासाठी उपयोग झाला आहे. पत्रकारांनी केलेल्या लेखनातून खूप मोठे बदल झाले आहेत. अशा साहित्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.'' बडे यांनी पत्रकारितेतील बदलांचा वेध घेतला. 

माध्यमांची सरकारला भीती नाही 
सरकारला प्रसार माध्यमांची भीती राहिली नाही. परखड विचार मांडणाऱ्यांना मारले जात आहे. हे चित्र असेच राहणार असेल तर लोकशाही संपेल, अशी खंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात व्यक्त केली.

Web Title: pune news Shripal Sabnis