वेतनाचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या 16 महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सोसायटीच्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने सोमवारी जाहीर केले. ऑक्‍टोबर 2016 वर्षापासूनचे वेतन मिळावे, पगार राष्ट्रीयीकृत बॅंकेतच जमा करावा, पुढील पगार दर महिन्याच्या दहा तारखेला व्हावा आणि सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून सोसायटीवर प्रशासक नेमावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

या प्रकरणात संस्थेवर कारवाई करण्यात राज्य सरकार, तंत्रशिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिरंगाई करत असल्याचा आरोपही समितीने केला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत असून, त्यांच्या शैक्षणिक समस्या प्राध्यापकांद्वारे सोडविल्या जात असल्याचेही समितीचे सचिन शिंदे यांनी नमूद केले. मनोज मुंगळे, डॉ. अतुल बागूल, हेमा मोरे आदी या वेळी उपस्थित होते. 

याबाबत शिंदे म्हणाले, ""सोसायटीने आम्हाला वेतन टप्प्याटप्प्याने देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सोसायटीने पहिल्या टप्प्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे पुन्हा तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही आंदोलन केले. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. त्यांनी आश्वासन न देता या प्रकरणावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणीही आम्ही करणार आहोत.''

Web Title: pune news Sinhagad Education Society professor employee