सहावी ते नववी नापासांना थेट दहावीला प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पुणे - अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे म्हणतात पण बरेचदा अपयश पचवून नवीन जोमाने पुढे जाण्याची तयारी मुलांमध्ये नसते म्हणूनच सहावी ते नववी अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना व अकरावी नापासांना यशाची एक नवीन संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ विद्या’, ‘सकाळ सोशल फाऊंडेशन’ व ‘तेजस विद्यालय’ यांच्यातर्फे मार्गदर्शन कार्यशाळा होत आहे. 

वय वर्षे १४ पूर्ण ते ६५ या वयोगटातील कमीत कमी पाचवी पास असलेल्या व्यक्तींसाठी ही कार्यशाळा उपयोगी ठरणार आहे. 

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण अपूर्ण राहिलेले, तसेच अकरावी नापास विद्यार्थी बारावीला प्रवेश घेऊ शकतात. जे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला प्रथमच बसत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नापास विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाची गरज, अपयश येण्याची कारणे, अपयशाचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम, अपयशामुळे खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी, त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड कमी करून आत्मविश्‍वास कसा वाढवता येईल यासारख्या अनेक विषयांवर हेमलकसाच्या लोकबिरादरीचे कार्यकर्ते अनिकेत आमटे, प्राचार्य विदुला शेटे आणि उपप्राचार्य प्रियांका कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 

अधिक माहिती...
केव्हा : रविवार, ११ जून

कधी - सकाळी ११ वा. 
कोठे - टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 
प्रवेश - विनामूल्य 
नावनोंदणी : www.sakalvidya.com 
संपर्क  : ९८५०९८९२२६ किंवा ९६५७०८३३२६

Web Title: pune news sixth to ninth fail student direct 10th admission