पुण्याची ओळख "फ्युचर रेडी' शहर होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - ""स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत "5 जी' तंत्रज्ञानाने परिपूर्ण म्हणून शहरातील पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. "फ्युचर रेडी' शहर म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. या सर्व योजनांसाठी पुढील 15 वर्षांत 31 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे,'' अशी माहिती पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली. 

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) पुणे केंद्राच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात "स्मार्ट सिटी पुणे - प्रकल्पाची सद्यःस्थिती व आव्हाने' या विषयावर डॉ. जगताप यांनी व्याख्यान दिले. याप्रसंगी उद्योजक अरुण फिरोदिया, केंद्राचे अध्यक्ष डॉ. गिरीश मुंदडा, मानद सचिव अविनाश निघोजकर, माजी सचिव वसंत शिंदे, डॉ. सुरेखा देशमुख आदी उपस्थित होते. 

फिरोदिया म्हणाले, ""शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे जाण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागला नाही पाहिजे, अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था आणि रचना होणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर पुढील तीन वर्षांत घनकचरा व्यवस्थापनावर अधिकाधिक खर्च करून कचरामुक्त शहर करण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन पर्यायांचा विचार केला पाहिजे.'' 

डॉ. देशमुख म्हणाल्या, ""अमेरिकेच्या "आयईईई स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह'ला पुणे स्मार्ट सिटी संलग्न झाली आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना पुणे शहरातील स्मार्ट योजनांची माहिती होऊ लागली आहे.''

Web Title: pune news smart city pmc rajendra jagtap

टॅग्स