‘स्मार्ट सिटी’च्या वतीने जनजागृतीसाठी रॅली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - ‘रॉबिन हूड आर्मी’ने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सोमवारी काढलेल्या सायकल रॅलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

पुणे - ‘रॉबिन हूड आर्मी’ने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सोमवारी काढलेल्या सायकल रॅलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

सायकल वापरून सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरण सुधारण्याच्या उद्देशाने नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अन्नाची नासाडी थांबविण्याबाबत जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेतील सायकली नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या. या वेळी अनेक नागरिकांनी उत्सुकतेने ‘सर्व्ह द हंग्री’ या अभियानाबद्दल; तसेच सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवेबद्दल जाणून घेतले. काही नागरिक स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झाले. रॅलीत ‘भुकेल्यांना अन्न द्या’, ‘काहीही वाया घालवू नका’ अशा घोषणांचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले. 

रॅलीच्या आधी स्वयंसेवकांच्या पथकाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले चौक येथे पथनाट्य सादर केले. गोखले चौकातून सुरू झालेल्या या रॅलीची मॉडर्न महाविद्यालयामार्गे जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यान येथे सांगता करण्यात आली.

Web Title: pune news smart city Public awareness rally