एसआरए हटाव; वडारवाडी बचाव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - "आपले घर, आपले अस्तित्व', "एसआरए हटाव, वडारवाडी बचाव' यांसारख्या घोषणा देत वडारवाडी येथील रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रस्तावित प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी मोर्चा काढला. युवतींसह महिला व वृद्धही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

वडारवाडी येथील हनुमाननगर कॉर्नरजवळील वस्तीमध्ये बाराशे कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. रहिवाशांचा विरोध असतानाही येथे "एसआरए' प्रकल्प होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र वडार समाज शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. रहिवाशांनी गुरुवारी "एसआरए'च्या चतुःशृंगी येथील कार्यालयासह महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढला. सुमन पवार, सोनल जाधव, विवेक पवार, चेतन चौगुले, नागेश बनपट्टे, मंगेश माने, महेंद्र पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

हा मोर्चा वडारवाडीतून मंजाळकर चौक, गोलंदाज चौक, सहस्रबुद्धे महाराज मठ, संत ज्ञानेश्‍वर पादुका चौकातून खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यालयावर काढण्यात आला. तेथे शिरोळे यांच्यासह नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे रहिवाशांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे उपायुक्त विलास कानडे, "एसआरए'चे उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांचीही भेट घेऊन शिष्टमंडळाने त्यांच्याकडे निवेदन दिले. कानडे यांच्यासह जाधव यांनीही यासंदर्भात योग्य भूमिका घेण्याचे आश्‍वासन दिले. वडारवाडीमध्ये "एसआरए' ऐवजी "वाल्मीकी आवास योजना' किंवा अन्य घरकुल योजना राबविण्यात याव्यात, सध्या असलेली घरे तशीच ठेवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. 

Web Title: pune news SRA slum