‘राधे राधे’चा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - नेत्रदीपक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, स्वयंसेवकांची लगबग, रांगोळ्या आणि विविध प्रकारच्या फुलांची मनमोहक आरास, आध्यात्मिक पुस्तके आणि महाप्रसादाचे वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, टाळ-मृदंगाचा गजर आणि सुमधुर कीर्तनाचा आवाज... अशा प्रकारच्या भक्तिमय वातावरणात ‘इस्कॉन’च्या कात्रज-कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिरात पुणेकरांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा अनुभव घेतला.

या सोहळ्याची सुरवात पहाटे साडेचार वाजता मंगल आरतीने झाली. या वेळी तीन हजार भाविक उपस्थित होते. त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष राधेश्‍याम प्रभू यांचे ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ या विषयावर प्रवचन झाले. दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, सह आयुक्त विलास कानडे, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. यादव, पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे, नगरसेविका संगीता ठोसर, माजी महापौर प्रशांत जगताप, मिलिंद एकबोटे, किरण साळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

Web Title: pune news Srikrishna Janmashtami

टॅग्स