डोळ्यांत स्टेंट टाकण्याचा प्रयोग यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पुणे - ‘‘काचबिंदूच्या नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया करून डोळ्यांत स्टेंट टाकण्याचा प्रयोग जगात यशस्वी झाला असून, ही उपचार पद्धती लवकरच आपल्याकडेही उपलब्ध होईल. त्यामुळे काचबिंदूच्या रुग्णांना रोजच्या रोज डोळ्यांत औषध घालण्याच्या त्रासातून सुटका होईल,’’ असा विश्‍वास नेत्ररोगतज्ज्ञांनी रविवारी व्यक्त केला.

पुणे - ‘‘काचबिंदूच्या नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया करून डोळ्यांत स्टेंट टाकण्याचा प्रयोग जगात यशस्वी झाला असून, ही उपचार पद्धती लवकरच आपल्याकडेही उपलब्ध होईल. त्यामुळे काचबिंदूच्या रुग्णांना रोजच्या रोज डोळ्यांत औषध घालण्याच्या त्रासातून सुटका होईल,’’ असा विश्‍वास नेत्ररोगतज्ज्ञांनी रविवारी व्यक्त केला.

महाराष्ट्र नेत्ररोगतज्ज्ञ संघटना आणि पुणे नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित काचबिंदूच्या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेनिमित्त पुण्यात आलेल्या नेत्रतज्ज्ञांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे आणि पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. आदित्य केळकर, राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील काचबिंदूतज्ज्ञ डॉ. पंकज बेंडाळे उपस्थित होते.

डॉ. सत्यन म्हणाले, ‘‘काचबिंदू हा अत्यंत चोरपावलांनी येणारा आजार आहे. डोळ्याची दृष्टी कमी कमी होण्यास सुरवात झाल्यानंतर बहुतांश रुग्ण उपचारांसाठी नेत्रतज्ज्ञांकडे धाव घेतात. गेलेली दृष्टी परत मिळविता येत नाही. पण, यापुढे दृष्टी कमी होऊन रुग्णाला अंधत्व येणार नाही, यासाठी उपचार करता येतील.’’ आतापर्यंत डोळ्यात ड्रॉप टाकणे, लेझर करणे आणि शस्त्रक्रिया हे उपचाराचे तीन मार्ग होते; पण आता डोळ्यांत स्टेंट टाकून काचबिंदूवर उपचार करण्याचा आणखी एक पर्याय पुढे आला आहे. याचा यशस्वी प्रयोग जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये झाला आहे. भारतातही पुढील काही महिन्यांमध्ये हे उपचार उपलब्ध होतील. त्यासाठी आवश्‍यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. देशातील डॉक्‍टरांनाही त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

चेन्नई येथील काचबिंदू तज्ज्ञ डॉ. मुरली अरीगा म्हणाले, ‘‘काचबिंदूबाबत जनजागृती आवश्‍यक आहे. लवकर निदान, प्रभावी उपचार आणि नियमित नेत्रतपासणीतून काचबिंदू निश्‍चित रोखता येते.’’ डॉ. रॉनी जॉर्ज म्हणाले, ‘‘बहुतांश रुग्णांमध्ये वयाच्या चाळिशीनंतर काचबिंदूचे निदान होते. यातील ९० टक्के निदान हे उशिरा होते. 

त्यामुळे अंधत्वाकडे होणारा त्यांचा प्रवास रोखता येतो. मात्र, नियमित ड्रॉप्स न टाकणे, सातत्याने नेत्रतपासणी न करणे, यामुळे १० टक्के रुग्णांना काचबिंदूमुळे अंधत्व येत आहे.’’

अशी होईल शस्त्रक्रिया
डोळ्यातील द्रवपदार्थ वाहून जाऊ शकत नाही. त्यातून नसांवर दाब वाढतो. हा दाब कमी करण्यासाठी १ मिलिमीटरचा छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. त्यातून ४५ मायक्रॉन इतक्‍या कमी आकाराचा स्टेंट डोळ्यात टाकण्यात येतो. त्यामुळे जास्तीचे द्रव या स्टेंटच्या माध्यमातून बाहेर येतो व डोळ्यावरील दाब कमी होतो.

Web Title: pune news staint fit in eye treatment