राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक गोंधळामुळे स्थगित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव आदी पदाधिकारी निवडीसाठी साेमवारी (ता. १९) संचालक मंडळाची सभा बाेलविण्यात आली हाेती. सभेचे कामकाज सुरू हाेऊन प्राेसेडिंगवर सह्या झाल्यानंतर गोंधळ सुरू झाला. या दरम्यान, एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने गोंधळात भर पडली. यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे आणि निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात अाल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवले आहे. दरम्यान, कायदा सुवस्थेच्या कारणास्तव सभा तहकूब करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीच्या सभेचे सूचनापत्र नव्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानंतर काढण्यात येईल, असे पत्र कटके यांनी संचालकांना पाठविले आहे.

Web Title: pune news state Cooperative team election confussion