गुणवंतांना शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी, असा प्रश्‍न सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे. या विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची वेळ आली, तरी प्रशासन ‘स्मार्ट’ केव्हा होणार, असेही त्यांनी म्हटले आहे.  

महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून शहरातील दहावीच्या परीक्षेत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी  १५ हजार रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

महापालिकेच्या गतिमान प्रशासनामुळे गेल्या वर्षीपर्यंत ही शिष्यवृत्ती किमान मार्च अखेर पर्यंत मिळत होती. यंदा मात्र या वर्षीचा दहावी- बारावीचा निकाल घोषित करण्याची वेळ आली तरी गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थी मिळाली नाही. मनपाचा कारभार ‘ई-गव्हर्नन्स’च्या माध्यमातून गतिमान करण्यात येणार असल्यामुळे ही रक्कम प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात थेट जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु आज अखेरपर्यंत या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. 

महापालिकेचा कारभार ‘स्मार्ट’ आणि ‘गतिमान’ झाल्याचा अनुभव किमान या गुणवंत विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून तरी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी मंचचे विवेक वेलणकर, विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: pune news student scholarship