महिला स्वच्छतागृहांविषयी जागर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे  - ""स्त्रियांना द्या इतका मान की वाढेल देशाची शान', "स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडविते', "स्वच्छता असेल जेथे, खरी प्रतिष्ठा येईल तेथे' अशा घोषणा देत शालेय विद्यार्थिनींनी स्वच्छतागृहाविषयी जनजागृती केली. 

पुणे  - ""स्त्रियांना द्या इतका मान की वाढेल देशाची शान', "स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडविते', "स्वच्छता असेल जेथे, खरी प्रतिष्ठा येईल तेथे' अशा घोषणा देत शालेय विद्यार्थिनींनी स्वच्छतागृहाविषयी जनजागृती केली. 

कोथरूड येथील महेश मराठी माध्यम विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्त्री सुरक्षितता याविषयावर काढलेल्या रॅलीत रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी पुरेशी स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी केली. कात्रजमध्ये स्वच्छतागृहाअभावी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थिनींनी ही रॅली काढली. महिला स्वच्छतागृहांचा प्रश्‍न "सकाळ'ने वृत्त मालिकांमधून वारंवार मांडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थिनींनी ही रॅली काढली. त्यात मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर याही सहभागी झाल्या. सातवी ते दहावीच्या सुमारे 60 विद्यार्थिनींनी रॅलीतून महिला सक्षमीकरणासह महिला स्वच्छतागृहांविषयी जनजागर केला. रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक आणि विमानतळ आदी ठिकाणी विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल आयोजित करावी आणि त्याद्वारे विद्यार्थिनी स्वच्छतागृहांच्या सोयीसुविधांची पाहणी करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर करतील, असे दहावीच्या विद्यार्थिनींनी सुचविले. 

शहर आणि उपनगरांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची गैरसोय होत आहे. त्यातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थिनींनी रॅलीतून जागृती केली. 
-जान्हवी अजोतीकर, मुख्याध्यापिका, महेश विद्यालय 

Web Title: pune news Students from Mahesh Marathi medium school have organized a rally on women safety