विद्यार्थ्यांनी तयार केल्या कागदी टोप्या....

राजकुमार थोरात
रविवार, 11 मार्च 2018

 उन्हाळा म्हटल की, डोळ्यासमोर टोपी येते. कुरवली मधील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील  विद्यार्थ्यांनी दुकानातुन टोप्या खरेदी करण्याचे टाळून शाळेमध्येच कागदाच्या सुंदर रंगीबेरंगी टोप्या तयार करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला

वालचंदनगर - कुरवली (ता.इंदापूर)  येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदापासुन रंगीबेरंगी टोपी तयार केल्या आहेत. 

सध्या ग्रामीण भागामध्ये कडक उन्हाळ्याला सुरवात झाली आहे. दिवसाचा पारा ३६ अंशाच्या वरती जावू लागला आहे.  उन्हाळा म्हटल की, डोळ्यासमोर टोपी येते. कुरवली मधील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील  विद्यार्थ्यांनी दुकानातुन टोप्या खरेदी करण्याचे टाळून शाळेमध्येच कागदाच्या सुंदर रंगीबेरंगी टोप्या तयार करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला. यासाठी मुले व मुलांनी  कागदी पेपर , पुठ्ठा, दोरीचा वापर केला आहे.  लहान, मोठ्या आकाराच्या रंगीबेरंगी टाेप्या लक्षवेधून घेत आहेत. विद्यार्थ्यांना टोप्या तयार करण्यासाठी कला शिक्षक बापूराव कदम, शाळेच्या मुख्याध्यापक गणेश घोरपडे यांनी मदत केली.

Web Title: pune news students school