आमदारांच्या शुभेच्छांनी दहावीचे विद्यार्थी भारावले...

राजकुमार थोरात
बुधवार, 14 मार्च 2018

सध्या दहावीच्या परीक्षा सुरु अाहेत. मागील आठवड्यामध्ये अधिवेशन सुरु असल्यामुळे आमदार भरणे  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देता आल्या नाहीत. आज (बुधवार) सकाळी अंथुर्णे येथील छत्रपती हायस्कुलमधील दहावीच्या परीक्षा केंद्राला आमदार भरणे अचानक भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून  विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. आमदारांनी शुभेच्छा दिल्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते

वालचंदनगर - अंथुर्णे  (ता.इंदापूर)  येथील छत्रपती हायस्कुलमधील दहावीच्या परीक्षा केंद्राला आमदार दत्तात्रय भरणे यांनी अचानक भेट देवून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्यामुळे विद्यार्थी भारावून गेले.

सध्या दहावीच्या परीक्षा सुरु अाहेत. मागील आठवड्यामध्ये अधिवेशन सुरु असल्यामुळे आमदार भरणे  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देता आल्या नाहीत. आज (बुधवार) सकाळी अंथुर्णे येथील छत्रपती हायस्कुलमधील दहावीच्या परीक्षा केंद्राला आमदार भरणे अचानक भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून  विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. आमदारांनी शुभेच्छा दिल्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी माजी सरपंच राहुल साबळे, तानाजी शिंदे, पी.डी.सोनवणे, भीमराव साबळे, भगवान वायसे, दत्तात्रय वायसे यांच्यासह परीक्षाकेंद्रावरील सर्व परीक्षक उपस्थित होते.

Web Title: pune news students school