संस्कृत महाकाव्यांचा अभ्यास व्हावा

संस्कृत महाकाव्यांचा अभ्यास व्हावा

पुणे - संस्कृत महाकाव्यांचा विचार पर्यावरणीय दृष्टिकोनातून होणं काळाची गरज आहे. त्या-त्या काळातील निसर्गासंबंधी विपुल माहिती असल्यानं ही काव्यं अभ्यासासाठी भव्य दालनं ठरू शकतील. हे लक्षात घेऊन केवळ साहित्यिक अंगानं या काव्यरचनांकडे मर्यादित कक्षेतून न पाहता त्यांचा विविधांगी अभ्यास व्हायला हवा, असं प्रतिपादन प्रसाद जोशी यांनी कालिदास दिनाच्या निमित्तानं केलं. ते डेक्कन कॉलेज विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असून, संस्कृत साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे.

जोशी म्हणाले, ‘‘पावसाचं वर्णन प्रथम मिळतं ते वैदिक वाङ्‌मयातील ‘पर्जन्यसूक्ता’मध्ये. पावसासाठी यात वापरलेली वेगवेगळी नावं त्याच्या स्वरूपावर आधारित आहेत. मेघगर्जनांची वर्णनंही लक्षात घेण्याजोगी आहेत. अशी कल्पना केली आहे, की ढगांमध्ये लपलेले पाण्याचे साठे इंद्र मोकळे करतो. पर्जन्य व धरेचं ‘सुफलन’ व ‘सृजना’चं नातंही सांगितलेलं आहे. 

वाहणारे वारे, विजांचा कडकडाट, अंतरिक्ष आदींचा रम्य तपशील कथन केलेला आहे. याचप्रमाणे ‘रामायणा’तही किष्किंधाकांडात वर्षाऋतूचं दर्जेदार वर्णन आहे. रामाला पावसामुळे सृष्टीत होणारे बदल आतुर करतात. तो उत्कटपणे म्हणतो की, नव्या पावसाचे तुषार पडल्यानं मातीतून जसे वाफारे निघतात, तसेच वाफारे तिकडे शोकसंतप्त झालेली सीताही टाकत असेल. इंद्रगोप किडे, मोरांचं नृत्य, पाण्याचा खळखळाट, पावसामुळे राजांच्या स्वाऱ्या थांबणं, ग्रीष्मात उडणारी धूळ खाली बसणं, आकाशात कुठं उजेड तर कुठं अंधाराची स्थिती व ढगांचा गडगडाट म्हणजे जणू वेदांचा घोषच, आदी रामायणातील वर्णनं भारावून टाकतात.’’

जोशींनी असंही सांगितलं, की कालिदासांच्या सर्वच काव्यांमध्ये निसर्ग निरनिराळ्या रूपांत वावरतो, तोच खरा नायक. त्याकाळच्या निसर्गाची बारकाईनं केलेली निरीक्षणं कालिदासांनी चित्रमय शैलीत मांडली असणार. याचा जबरदस्त प्रभाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com