संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून प्राचार्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून प्राचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील येवलेवाडी परिसरात काल (ता. 26) रात्री उघडकीस आली. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील के. एन. महाविद्यालयात कार्यरत होते. घटनास्थळी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. 

गजानन लक्ष्मीनारायण तेडीवाल (वय 54, रा. येवलेवाडी) असे त्या प्राचार्याचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन तेडीवाल हे कारंजा लाड येथील के. एन. महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा येवलेवाडी येथे राहतात. मुलगा हिंजवडी येथील एका कंपनीत इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर आहे. काही दिवसांपूर्वी ते येवलेवाडी येथील मार्व्हल अलबेरो सोसायटीत राहण्यास आले होते. त्यांच्या पत्नी कामानिमित्त माहेरी अकोला येथे गेल्या होत्या. ते आणि त्यांचा मुलगा हे दोघे येथील फ्लॅटमध्ये राहत होते. मुलगा काल रात्री कामावरून घरी परतला. त्याने दरवाजा उघडला असता गळफास घेतलेल्या अवस्थेत गजानन तेडीवाल यांचा मृतदेह आढळून आला. मुलाने ही बाब कोंढवा पोलिसांना कळविली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट आढळली आहे. त्यात संस्थेच्या व्यवस्थापनातील दोन वरिष्ठ संचालकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. 

Web Title: pune news suicide crime