आधी उन्हाचा चटका, त्यात हवाही बेकार!

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 30 मार्च 2018

उन्हाचा चटका आता वाढत चालला आहे.. त्यात प्रदूषणामुळे हा मोसम आरोग्याच्या दृष्टीने अधिकच खडतर झाला आहे. वाहन चालवताना रस्त्याने उडणारी धूळ ही आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक आहे. त्यामुळे डोळ्यांवर गॉगल आणि नाकावर रुमाल बांधून दुचाकी चालविणे स्वत:साठी चांगले आहे.

उन्हाचा चटका आता वाढत चालला आहे.. त्यात प्रदूषणामुळे हा मोसम आरोग्याच्या दृष्टीने अधिकच खडतर झाला आहे. वाहन चालवताना रस्त्याने उडणारी धूळ ही आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक आहे. त्यामुळे डोळ्यांवर गॉगल आणि नाकावर रुमाल बांधून दुचाकी चालविणे स्वत:साठी चांगले आहे.

पुणे - हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या धुराबरोबरच शहरात धुळीचे प्रमाणही वाढत आहे. जून-जुलैपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळी दिवसांमध्ये हवेची गुणवत्ता चांगली असते. त्यानंतर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरनंतर एप्रिल-मेपर्यंत हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत जाते. या कालावधीत सल्फरडाय ऑक्‍साईड आणि नत्र वायूंबरोबरच धूलिकणांचे प्रमाणही वाढते आहे आणि हे आरोग्यासाठी धोकादायक चिन्ह आहे.

का वाढतेय प्रदूषणाची पातळी?

 • २००७ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार रस्ते हे हवेतील धूलिकणांच्या वाढीचे मुख्य कारण होते.
 • २०१७ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार विविध प्रकारची बांधकामे हे कारण आहे.
 • मेट्रो, उड्डाण पूल, रस्त्यांची खोदकामे यातून धूलिकणांचे हवेतील प्रमाण वाढत आहे. 
 • रस्ते डांबरी असताना किंवा सिमेंटचे केल्यानंतरही या धूळीचे प्रमाण कायम असल्याचे निरीक्षण.
 • रस्त्यांचा दर्जा चांगला नाही
 •  रस्ते स्वच्छ केले जात नाहीत
 •  सोसायट्यांच्या आवारात जाळला जाणारा कचरा
 •  वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरातून हवेचे प्रदूषण 

पुण्यातली हवा पावसाळ्यातच 'बेस्ट'!
पुण्यात पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर श्‍वसनासाठी चांगली हवा असते. हवेतील दूषित वायू पडणाऱ्या पावसात विरघळतात, तर हवेत तरंगणारे सूक्ष्म धूलिकण पावसाच्या पाण्याबरोबर खाली येतात. त्यामुळे स्वच्छ हवा पुणेकरांना मिळते.

असे करू उपाय...

 • सीएनजीचा सार्वत्रिक वापर आवश्‍यक
 • दर्जेदार इंधन वाहनात वापरणे
 • उघड्यावर कचरा जाळण्यास प्रतिबंध करणे
 • वाहनांची प्रदूषण पातळी काटकोरपणे तपासणे
 • रस्त्यांची स्वच्छता सातत्याने करणे
 • विकास प्रकल्पांमधून निर्माण होणारी धूळ नियंत्रित करणे
 • सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणे

पुणे महानगरपालिका हद्दीबाहेर मिळणाऱ्या पेट्रोलबाबत तुम्हाला काय वाटतं?

Web Title: pune news summer health environment