वीजबिले न भरल्यास पुरवठा खंडित होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पुणे - महावितरणच्या पुणे परिमंडल क्षेत्रात सुमारे पाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे १२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार सांगूनही थकबाकीदारांनी ही बिले भरलेली नाहीत. त्यामुळे बिले थकविणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे.

दिलेल्या मुदतीत वीजबिलाचा भरणा केला जात नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. पुणे परिमंडलातील ९१ हजार ११ कृषिपंपधारकांकडे वीजबिलांची सुमारे २०१ कोटी ७३ लाख रुपये, तर सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर वर्गवारीतील ७ हजार ८४७ वीजग्राहकांकडे ८० कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.

पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगावसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्‍यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: pune news The supply will be broken if the electricity bill is not paid