मन लोभले... गीतांत न्हाली तुजमुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

गायक महेश काळे यांच्या ‘सूर निरागस हो’ कार्यक्रमात श्रोते तल्लीन

पुणे - सर्व रागांचा राजा मानला जाणारा ‘मालकंस’सारखा रात्रीचा राग असेल किंवा ‘मिश्र धानी’सारख्या रागावर सामूहिक वादन असो... पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘घेई छंद मकरंद’ असेल किंवा सुधीर मोघे यांचे ‘मन लोभले मनमोहने, गीतांत न्हाली तुजमुळे’ असेल... हे सगळे ऐकायला मिळाले पारंपरिक अनुभवासोबतच पाश्‍चात्त्य शैलींमधून अन्‌ प्रयोगशील संगीतातून. गायक महेश काळे यांच्या या अनोख्या आणि अद्‌भुत अशा प्रयोगाला पुणेकर श्रोत्यांनी उभं राहून दाद दिली.

‘सकाळ’ने आयोजिलेल्या ‘रंग दे मेहंदी’ स्पर्धेच्या निमित्ताने महेश यांचे ‘क्‍लासिकल टु फ्युजन’ गायन श्रोत्यांना ऐकायला मिळाले. या वेळी ‘मन लोभले... गीतांत न्हाली तुजमुळे’ अशीच अवस्था श्रोत्यांची झाली होती. ‘मराठे ज्वेलर्स’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक, तर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ हे सहप्रायोजक होते. मैफलीची सुरवात ‘कट्यार थीम’ ने करण्यात आली. विविध वाद्यांवरील या कलाविष्कारानंतर महेश यांनी गायनाला सुरवात केली आणि काही वेळातच आपल्या सुरेल स्वरांनी त्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘भर पंखातून स्वप्न उद्याचे, झेप घे रे पाखरा’ या गीतानंतर ‘आम्हा न कळे’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ हे भजन सादर करून त्यांनी श्रोत्यांना भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली. प्रसाद पाध्ये (तबला), रितेश ओव्हाळ (इलेक्‍ट्रिक गिटार), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), अभिजित भदे (ड्रम्स), अनय गाडगीळ (की-बोर्ड), नीलेश देशपांडे (बासरी), प्रसाद जोशी (पखवाज) यांनी त्यांना समर्पक साथ केली. त्यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

शास्त्राच्या पलीकडे जाऊन नाद उत्पत्तीकडे आजच्या पिढीचे जास्त लक्ष आहे. म्हणून संगीतात वेगवेगळे प्रयोग करत आहे. हा एक प्रयोग आहे. तरीसुद्धा याला पुणेकरांची मनापासून दाद मिळत आहे. हे पाहून नतमस्तक व्हायला होते.
- महेश काळे, गायक

Web Title: pune news sur niragas ho event