बहारदार ‘स्वर चैत्र’ कार्यक्रमाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे - ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ सभासद व कुटुंबीयांसाठी सोमवारी (ता. २६) स्वर चैत्र हा भावगीत चित्रपट संगीत, नाट्यसंगीत तसेच कविता असा बहारदार कार्यक्रम सायंकाळी ६.३० वा. घरकुल लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल येथे सादर केला जाणार आहे.

संगीत सम्राट या ‘झी युवा’च्या वाहिनीवरील कार्यक्रमाच्या विजेत्या महाराष्ट्राभर रसिकाच्या पसंतीची पावती मिळणाऱ्या अंजली व नंदिनी गायकवाड रसिकांच्या आवडीची गाणी सादर करतील. या जोडीतील अंजली हिने तर ‘झी सारेगमप (हिंदी) या कार्यक्रमातही विजेतेपद पटकाविले आहे. 

जगभरातील मराठी रसिकांची वाहवा मिळविणारा तरुण सिद्धहस्त कवी संदीप खरे याच्या कविता आणि गप्पा हे सुद्धा या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य. मराठी, तमीळ चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटांतील गाण्यांना आवाज देणारी लोकप्रिय युवा गायिका सावनी रवींद्र तिच्या साथीदाराबरोबर अनेक लोकप्रिय गाणी सादर करेल.एकंदरीत नवीन वर्षात नावीन्य आणि यापूर्वी मनावर राज्य केलेल्या कविता, गाणी असा हा भरगच्च कार्यक्रम असेल. सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजित या जोडीमधल्या विश्वजित जोशी यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग असेल, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवत यांचं असेल. 

संकल्पना नेहा नगरकर नवीन वर्षातला स्वर-चैत्र हा बहारदार कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच असेल. लोटस खाकरा, शबरी खाकरा हे कार्यक्रमाचे प्रायोजक तर हॉटेल श्रेयस स्थळ प्रायोजक आहेत. 

सभासदांसाठी सूचना 
सभासदांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रवेश विनामूल्य 
९०७५०१११४२ या क्रमांकावर प्रवेश नोंदणी सकाळी ११ पासून अथवा ७७२१९८४४४२ या क्रमांकावर व्हॉट्‌सॲपवरून नावनोंदणी करू शकता. 
कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी प्रवेश दिला जाईल. 
ओळखपत्र, माहिती पुस्तिकेतील पाचवा क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड सोबत आणणे आवश्‍यक. 
काही जागा राखीव

Web Title: pune news swar chaitra event sakal sahyadri suraksha kavach