क्षण आला भाग्याचा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवातील नाट्यगीतांना रसिकांची दाद
पुणे - ‘घेई छंद मकरंद’, ‘सावन घन गरजे’, ‘येतील कधी यदुवीर’, ‘गर्द सभोवती’, ‘क्षण आला भाग्याचा...’ अशा अवीट गोडीच्या नाट्यगीतांनी शनिवारी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या नाट्यमैफलीला रसिकांनीही भरभरून दाद दिली. निमित्त होते ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’चे ! 

सृजन फाउंडेशन व नांदेड सिटीतर्फे दहाव्या ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’चे टिळक स्मारक मंदिरात आयोजन केले होते. स्वरोत्सवाचे उद्‌घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, ‘स्वरवंदना’ संस्थेच्या प्रमुख वंदना खांडेकर उपस्थित होत्या. सुमेधा देसाई, प्रल्हाद हडफडकर आणि अस्मिता चिंचाळकर यांच्या संगीतमैफलीने स्वरोत्सवाचा प्रारंभ झाला.  

देसाई यांनी सादर केलेल्या पहिल्याच रचनेने रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. त्यानंतर हडफडकर यांनी ‘सावन घन गरजे’ ही रचना सादर केली. चिंचाळकर यांनी सादर केलेल्या ‘घेई छंद मकरंद’ आणि ‘ललना मना’ या नाट्यगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. ‘सुवर्णतुला, ‘एकच प्याला’,  ’कधीतरी कोठेतरी’, ‘मत्स्यगंधा’ यांसारख्या अशा विविध संगीत नाटकांमधील नाट्यगीते या वेळी सादर करण्यात आली. उदय कुलकर्णी (ऑर्गन), दयेश कोसंबी (तबला) यांनी साथसंगत केली.

Web Title: pune news swarotsav song event