स्वाइन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - स्वाइन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातून उपचारांसाठी पुण्यात आणलेल्या स्वाइन फ्लू आणि डेंगी झालेल्या रुग्णाचा मंगळवारी रात्री येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शहरात या वर्षी आतापर्यंत स्वाइन फ्लूचे 69 रुग्ण मृत्युमुखी पडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. तसेच, उस्मानाबाद येथील महिलेचाही पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. 

सातारा जिल्ह्यातील (ता. कोरेगाव) चाळीस वर्षांच्या रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांच्या घशातील द्रव पदार्थ तपासण्यासाठी 16 जुलै रोजी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल 18 जुलैला मिळाला. त्यातून स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्याच वेळी डेंगी झाल्याचेही निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच 18 जुलैला मध्यरात्री मृत्यू झाला. 

पिंपरी चिंचवडमध्येही 32 वर्षांच्या महिलेचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला. त्या मूळच्या उस्मानाबाद येथील रहिवासी होत्या. त्यांना 15 जुलैला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातून त्यांना स्वाइन फ्ल्यू असल्याचे स्पष्ट झाले होते. 

Web Title: pune news swine flu