पुण्यात "स्वाइन फ्लू'ने तीन मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी पुढे आली. शहरात या रोगाने गेल्या सात महिन्यांमध्ये 74 रुग्ण मृत्युमुखी पडले असून, त्यात पुण्यातील 22 रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या 52 रुग्णांचाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

औरंगाबाद, वडगाव बुद्रुक येथील पुरुष आणि भोर येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

शहरात 1 जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे 355 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 264 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले. स्वाइन फ्लू झालेल्या 13 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

दृष्टिक्षेपात पुण्यातील स्वाइन फ्लू 
- सात महिन्यांमध्ये तपासलेले रुग्ण - 4 लाख 66 हजार 581 
- स्वाइन फ्लूचे औषध दिलेले रुग्ण - 8930 
- घशातील द्रवपदार्थाचे तपासलेले नमुने - 1468 
- रुग्णालयात दाखल रुग्ण - 17 

Web Title: pune news swine flu