पंढरपूर येथील महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - स्वाइन फ्लूमुळे पुण्यात एका महिलेचा मृत्यू झाला. शहरात एक जानेवारीपासून आतापर्यंत 75 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 22 रुग्ण महापालिका हद्दीतील होते. उर्वरित 53 रुग्ण शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारी देण्यात आली. 

पंढरपूर येथील एका महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत होती. त्यांना शहरातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. लक्षणे दिसताच त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. त्यांच्या घशातील द्रव पदार्थ तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान 24 जुलै रोजी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी (ता. 26) संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले. 

स्वाइन फ्लू झालेल्या 13 अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. एक जानेवारीपासून आतापर्यंत 369 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यापैकी 272 रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळे ताप, थंडी, खोकला, सर्दी, डोकेदुखी, उलट्या अशी प्रमुख लक्षणे दिसताच नागरिकांनी वेळ न घालवता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मधुमेह, हृदयविकार, गर्भवती अशा रुग्णांनी याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: pune news swine flu women