पाण्याची बाटली घ्या लेबल पाहून

योगीराज प्रभुणे
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे -‘‘पाण्याची बाटली कितीला आहे हो काका,’’ असा प्रश्‍न विचारून तुम्ही अनेकदा पाण्याची बाटली विकत घेतली असेल; पण पोटात जाणारे हे पाणी कितपत सुरक्षित आहे, याची खातरजमा तुम्ही करता का? नसाल, तर यापुढे नक्की करा. कारण, वर्षभरात १५ कारखाने विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निदर्शनास आले आहे.

पुणे -‘‘पाण्याची बाटली कितीला आहे हो काका,’’ असा प्रश्‍न विचारून तुम्ही अनेकदा पाण्याची बाटली विकत घेतली असेल; पण पोटात जाणारे हे पाणी कितपत सुरक्षित आहे, याची खातरजमा तुम्ही करता का? नसाल, तर यापुढे नक्की करा. कारण, वर्षभरात १५ कारखाने विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निदर्शनास आले आहे.

पुणे परिसरात बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या ४२ कारखान्यांना ‘एफडीए’ने परवानगी दिली आहे. प्रतिदिन दोन हजार लिटरपेक्षा कमी उत्पादन करणारे हे कारखाने आहेत. मात्र, शहराच्या परिसरात असे १५ कारखाने सापडले आहेत, की ज्यांना परवानगीच नव्हती. उन्हाळ्यामुळे पुणे विभागात पिण्याच्या पाण्याची मागणी वेगाने वाढली आहे. अशावेळी बाटलीबंद पिण्याच्या पाण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. मात्र, या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या पुणे विभागातील कारखान्यांची तपासणी करण्यात आली. 

तुम्ही लेबलवर हे पाहा!
बाटलीबंद पाण्याच्या उत्पादनासाठी ‘ब्युरो ऑफ इंडियन 
स्टॅंडर्ड’ची (बीआयएस) मान्यता घेणे बंधनकारक आहे. 
ही मान्यता असल्यास त्या बाटलीबंद पाण्याच्या लेबलवर 
‘आयएसआय’चा मानांकन क्रमांक दिला जातो. 
अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार परवानगी घेतलेला 
परवाना क्रमांक लेबलवर प्रसिद्ध केलेला असतो. 
लेबलवर या बाटलीच्या बॅचचा क्रमांक ठळकपणे दिलेला 
असतो.
बाटलीतील पाणी उत्पादन केल्यापासून किती दिवसांमध्ये 
पिणे योग्य आहे, याचीही नोंद लेबलवर असते.

बाटलीबंद पाण्यासाठी इथे तक्रार करा?
बाटलीबंद पाण्याबाबत तुमची तक्रार ‘अन्न व औषध प्रशासन’मध्ये करू शकता. औंध येथील सयाजीराव गायकवाड संकुलातील पाचव्या मजल्यावर हे कार्यालय आहे. १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

नागरिकांनी बाटलीबंद पाणी खरेदी करण्यापूर्वी त्याचे लेबल पाहावे. लेबल दोष आणि कमी दर्जाचे पाणी असलेल्या सहा उत्पादकांना दंड ठोठावला आहे, तर असुरक्षित पाणी उत्पादन करणाऱ्या उत्पादकाविरोधात खटले दाखल केले आहेत.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: pune news Take a bottle of water to see the label