वेळ नदीला पूर आल्यामुळे शिक्रापूर-न्हावरे रस्ता बंद

नागनाथ शिंगाडे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वेळ नदीला पूर आल्याने शिक्रापूर-न्हावरे रस्ता रविवारी मध्यरात्रीपासून बंद झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वेळ नदीला पूर आल्याने शिक्रापूर-न्हावरे रस्ता रविवारी मध्यरात्रीपासून बंद झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात रविवारी सायंकाळी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने वेळ नदीला पूर आला आहे. गेल्या 10 वर्षांपासून वेळ नदीला असा पूर आला नव्हता. पुरामुळे रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर हा रस्ता बंद होता. सोमवारी गावच्या आठवडा बाजारावरही विपरीत परिणाम झाला. न्हावरेमार्गे येणारी वाहतूक पूर्ण बंद झाल्याने बाजारावर मोठा परिणाम झाला. तसेच, न्हावरे, उरळगाव, दहिवडी, पारोडी, टाकळी भीमा या गावांतील नागरिकांनी निमगाव म्हाळुंगी-कासारी रस्त्याने शिक्रापूरमार्गे तळेगाव ढमढेरे येथे येणे पसंत केले. सध्या शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षा चालू असल्याने नदीच्या पलीकडील विद्यार्थ्यांना मोठे वळण घेऊन यावे लागले. दूध, भाजीपाला विक्रेते, व्यापारी, ग्राहक व विक्रेते या सर्वांवर परिणाम झाला.

दरम्यान, या पावसामुळे रांजणगाव गणपती, करंजावणे, कासारी, निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा आदी गावांतील ओढ्यांना पूर आल्याने बहुतांश ठिकाणचे रस्ते बंद होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news talegaon dhamdhere wel river flood