तळेगाव 'MIDC क्षेत्र- 4'ला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर

रामदास वाडेकर
मंगळवार, 18 जुलै 2017

या अंदोलनासाठी विशेष सहकार्याची भूमिका सुनिल भोंगाडे यांनी मांडली. या ठरावाच्या प्रतिची सबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. 

टाकवे बुद्रुक : तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ ला विरोध करण्याचा ठराव निगडे, कल्हाट, आंबळे, पवळेवाडी येथे झालेल्या बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला. निगडेतील भैरवनाथ व कल्हाटच्या विठ्ठल रखूमाई मंदिरात या अनुषंगाने गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.

उपसभापती शांताराम कदम, सुदाम कदम, भिकाजी भागवत, अॅड. सोमनाथ पवळे, देविदास भांगरे, मनोज करवंदे, गोंविद आंभोरे, मोहन घोलप, गोपाळ पवळे, संदीप कल्हाटकर, तानाजी करवंदे, गणेश भांगरे, नथं थरकुडे, संदीप गायकवाड, भरत घोजगे, मदन भांगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठये संख्येने उपस्थितीत होते.

तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ ला साठीआंबळे, निगडे, कल्हाट, पवळेवाडीतील सुमारे २७०० हजार हेक्टरवर संपादन केले जाणार आहे. या संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हे संपादन झाल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होईल, या गावातून सुरू असलेली बागायती व फळझाडांची शेती संपुष्टात येईल. या परिसरातील कारखानदारीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल. कारखान्याचे पाणी आंद्रा धरणात सोडल्यास पाणी दूषित होईल. या भागातील नैसर्गिक सधनता संपुष्टात येईल. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध दर्शवला.

भास्कर पुंडले, शांताराम कदम, सुदाम कदम, सोमनाथ शेलार, बबन आगिवले, यांची भाषणे झाले. या अंदोलनासाठी विशेष सहकार्याची भूमिका सुनिल भोंगाडे यांनी मांडली. या ठरावाच्या प्रतिची सबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. प्रास्ताविक भिकाजी भागवत यांनी केले. शिवाजी करवंदे सुत्रसंचालन यांनी केले. बाळासाहेब थरकुडे आभार यांनी मानले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: pune news talegaon midc zone four acquisition protests