आज, उद्या भरता येणार सवलतीत मिळकतकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

पुणे - सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यासाठी येत्या शनिवारी (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) महापालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये, संपर्क कार्यालये आणि मुख्य इमारतीमध्ये महापालिकेने सुविधा ठेवली आहे. दोन्ही दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान नागरिकांना सवलतीमध्ये मिळकत कराचा भरणा करता येईल. 

सवलतीमध्ये मिळकत कराचा 30 जूनपर्यंत भरणा करता येणार आहे. 1 जुलैपासून दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे. एक एप्रिल ते 22 जून अखेर 2 लाख 81 हजार 830 मिळकतदारांनी सुमारे 370 कोटी 86 लाख रुपयांचा, तर ऑनलाइन पद्धतीने 2 लाख 54 हजार 595 मिळकतदारांनी 238 कोटी 86 लाख रुपयांचा कर भरणा केला आहे, तर 1 कोटी 94 लाख रुपयांचा अन्य कर जमा झाला आहे. महापालिकेच्या तिजोरीत एकूण 611 कोटी 56 लाख रुपयांचा करभरणा झाला आहे. 30 जूनपर्यंत मिळकत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण कराच्या दहा टक्के, तर 25 हजार रुपयांपेक्षा जास्त कर असलेल्या मिळकतदारांना 5 टक्के सवलत मिळणार आहे. याची नोंद घेऊन नागरिकांनी कर भरणा करावा, असे आवाहन मिळकतकर विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त सुहास मापारी यांनी केले आहे. 

Web Title: pune news tax