दहा लाखांची खंडणी दोन जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - कोंढव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात फिरोज बंगाली याच्या भावासह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असून, आरोपींनी 10 लाखांपैकी दोन लाख रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. 

रियाज रहीम बंगाली (वय 34) आणि अमीन शेख (वय 32, दोघे रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत; तर त्यांचे दोन साथीदार अकबर अब्दुल करीम शेख ऊर्फ अकबर चावी आणि रफीक थापा या संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रियाज बंगाली याच्यावर सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त समीर शेख यांनी मंगळवारी दिली. 

फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाने भागीदारीत कोंढवा परिसरात बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. आरोपी रियाज बंगाली याने फिर्यादीकडे 10 लाख रुपये  खंडणीची मागणी केली. फिर्यादींनी भीतीपोटी रियाज आणि इतरांना कौसरबाग येथील एका हॉटेलमध्ये दोन लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्‍कम न दिल्यास मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने तक्रार केली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि सहायक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांनी ही कारवाई केली.

Web Title: pune news Ten lakhs of ransom

टॅग्स